वडगाव : रमेश कदम
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मुर्टी येथे सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मुर्टी या ठिकाणी बेकायदेशीरपणे तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.
या आरोपींवर झाली कारवाई:
चंद्रकांत यशवंत कुचेकर (वय ५०, रा. मोरगाव)
उमेश सत्यवान कांबळे (वय ५४, रा. मोरगाव)
संदीप ग्यानबा गायकवाड (वय ४४, रा. मोरगाव)
संपत चंदर बालगुडे (वय ५४, रा. मुर्टी)
दत्तात्रय पोपट गायकवाड (वय ३३, रा. पणदरे)
सुरेश सदाशिव पवार (वय ५२, रा. करंजेपूल)
४,२५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत:
पोलिसांनी घटनास्थळावरून ४,१५० रुपये रोख रक्कम आणि जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी १०० रुपये किमतीची पत्त्यांची दोन कॅट, असा एकूण ४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा (गु. रजि. नं. १६६/२०२६) दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वारुळे करत आहेत.

0 Comments